• If you are trying to reset your account password then don't forget to check spam folder in your mailbox. Also Mark it as "not spam" or you won't be able to click on the link.

Adultery घर दहा वर्ष दूर

hemya

Enchanted Chronicles✨
626
4,357
124
घर दहा वर्ष दूर

भाग १

तिथ आल्यावर समोरील रस्ता पाहून विचित्र वाटत होत. मागच्या दहा वर्षांपासून इथ नसल्याची जाणीव होत नव्हती. सीट वर करून थोडी पाठ मी मोकळी केली, खूप मोठया प्रवासानंतर माझी पाठ अकडून गेली होती.

मोठा श्वास घेऊन, मी इकडे तिकडे पाहिले. दहा वर्ष झाले पण तरीही काहीच बदललं नाही सगळ काही जस कालच झाल्यासारखं वाटत होत. गाडीचा दरवाजा उघडून मी मोकळ्या हवेला आलिंगन दिल.उन्हाळा होता आता विदर्भ तसा ही उन्हं न पाण्यासाठी बदनाम आहे. पण मला इतक्या दिवसाने इथची मोकळी उन घेऊन बर वाटल.मोठ मोठ्या इमारतींनी कोंडलेली ती उन इथल्या मोकळ्या वातावरणाची कधीच बरोबरी करू शकत नाही.

कारच्या जवळपास थोड चालून, लंबा श्वास घेऊन.

"चल!" मी स्वतःला म्हणालो. "होऊन जाऊदे एकदाच"

मी समोरचा दरवाजा वाजवल्यावर कोणाचं तरी पायांचा आवाज दरवाज्याकडे येत होता.

आईने दरवाजा उघडल्यावर मला पाहून आश्चर्य व्यक्त केल. डोळे एकदम फुलून गेले.

" बाळा ,तू?" तिच्या चेहऱ्यावर भाव पाहण्यासारखा होता.

"हो मीच"

आईने वेळ न घालवता लगेच मला मिठी दिली माझा गालांवर हाथ ठेवून ती ओल्या डोळ्याने बोलली.

"किती दिवस झाले रे? वाट पाहून थकली होती रे पवण्या" हे बोलताच माझी आई रडायला लागली. माझ्या वडिलांना मरून सहा महिने झाले. त्यांनंतर तिला नक्कीच माझी आठवण आली असणार आता घरच्यांशी कॉन्टॅक्ट नसल्याने, मला ही गोष्ट काल कळाली. ती कळताच मी सगळे विचार बाजूला ठेवून घरी आलो.

तिचे हुंदके माझ्या छाती वर जाणवल्यावर तिला वेगळ करून , तिचे मी डोळे पुसले .
तिने अंदर घेऊन माझ्यावर प्रश्न ओतणे चालू केले.

" कुठ होतास तू? आणि अचानक कसा आला, मी मेल्यावर आला असता तरी चाललं असत, तसाही तू विसरलाच होता की आपली 'आई' सुध्दा आहे." हे बोलताना तिच्या डोळ्यातले अश्रू पुन्हा अनावर झाले. मी त्या डोळ्यात ते दुःख पाहत होतो जे मी या माझ्या मायमाऊलीला दिलं.

" आई खर सांगू तर मी येणार नव्हतो, जेव्हा तूम्ही सगळ्यांनी 'प्रगती'ची बाजू घेतली ,खास करून 'तू' तेव्हा कळलं की या घरात माझं कोणी नाही " हे बोलता बोलता माझ्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.

" आई , तुझी खूप आठवण आलति गं, इतके दिवस तुमचा राग मनात ठेवून जगलो, पण मला आता बाबाच कळल्या वर" यापुढे मी बोलू शकलो नाही घसा अचानक बंद होत गेला.

या वेळेस आईने रडता रडता मला मिठीत घेतलं.

थोड्या वेळाने शांत होऊन , ती म्हणाले.

" हात पाय धू , मी जेवायला लावते तुझी ताई आणि जावई इथेच आहे."

थोड्या वेळाने हात पाय धुवून मी हॉल मध्ये आलो. माझ्या ताईच लग्न मी इथे होतो तेव्हाच झालं होत. ताई माझ्या पेक्षा मोठी होती तरी पण माझं लग्न तिच्या आधी झालं.
कारण काय तर, माझं आणि प्रगती च लव्ह मॅरज होत.

प्रगती ही माझ्या ताईची लहानपणीची मैत्रीनं, म्हणून ती रोज माझ्या घरी येत, माझ्या पेक्षा दोन वर्षाने मोठी असून ही माझं पाहिलं प्रेम तिच्यावरच होत.

रोज मी तिला पाहण्यासाठी शाळेत लेट जायचो, त्यांची शाळा सकाळची होती आणि त्या 11.30 ला घरी येत आणि माझी शाळा 11 ला सकाळी चालू होत होती. फक्त माझ्या ताईसोबत घरा पर्यंत येताना तिला पाहण्यासाठी मी शाळेत मार खाणे साधारण गोष्ट झाली. मी पूर्णतः तिच्या मागे वेडा होतो. इंग्रजीत त्याला आपण ओबस्सेस म्हणू शकतो. पण मग मी ओव्हरओबसेस होतो अस समजावं, माझ्या वहीचे पान तिच्या नावाने भरलेली, स्वप्नात ती दिसल्यावर सकाळ काकडार्तीला जाण्यापेक्षा जास्त उत्साहित आणि आनंदित व्हायची.तिचे निळे घार्सर डोळे, त्यातही तिचा रंग सोन्याचा.

बाहेर मी खूपदा खेळनं सोडून त्यांच्या गोष्टी ऐकायचो. माझी बहिण शिव्या द्यायची की, 'मला दुसर काम नाही का?' 'बाई सारखा घरघुसे पणा करतो', पण त्याच अनुषंगाने काही दिवसांनी माझी आणि प्रगतीची ही मैत्री झाली.या मैत्रीत माझी तीच्याबद्दलची काळजी तिला दिसून आली.तिची एवढी काळजी कोणी केली नसेल.

मैत्रीचं प्रेम ही तिच्या मनात ही लवकरच झालं. माझ्या बहिणीला हे सर्व पटल नाही पण तिने प्रगतीच्या खातिर या गोष्टीला होकार दिला. आणि घरच्यान पासून लपवण्यात मदत ही केली. पण माझी आणि प्रगतीची पदवी पूर्ण झाल्यावर मी घरच्यांना सांगून दिलं. कारण माझ्या मनात काही ही शंका नव्हती, ती माझं पहिलं 'प्रेम' आणि मी तिच्या शिवाय आयुष्याचा विचार ही करू शकत नव्हतो.

तिच्या आईनेही स्वतः एकटी पालक असल्यामुळे या गोष्टीला होकार देऊन दिला.

माझ्या लग्नानंतर वडीलांची तब्येत खराब झाली. म्हणून ताईचं ही लग्न लाऊन देण्यात आल. त्यांना बाळ लग्नाच्या पहिल्याच वर्षी झालं. मी आणि प्रगतिने या बाबतीत एवढी घाई नाही केली. प्रगती कामात खूप व्यस्त असायची मग तो मुलाचा विचार पुढे धकलण्यात आला.

पण ती किती मोठी चूक होती ते मला काही महिन्यानेच कळल.

मी प्रगती साठी तिच्या पासून दूर जायचं काम पडू नये म्हणून CA सोडून बी.कॉम केलं. क्लासेस तेव्हा आमच्या शहरात CA चे नव्हते. तिथे मास्टर करून मी कॉलेज ला अकाउंट्स शिकवायला लागलो त्याच कॉलेज ला प्रगती मराठी शिकवत होती.आमची दोघांची ही मैत्री तिथे साहिल नावाच्या व्यक्ती सोबत झाली. लगेच तिथल वातावरण दोघांना जमायला लागलं.

खुणा तेव्हा ही होत्या अस नव्हत पण, मी तिच्या प्रेमात खूप वेडा होतो म्हणून तिची चिडचिड सगळी सहन केली. आमच्यात थोड बोलण कमी झालं, दुरावा येत गेला.
पण मला वाटल हा फेज आहे, निघून जाईल जेव्हा आम्हाला बाळ होइल तेव्हा सर्व मार्गी लागेल.

काही दिवसाने ती खूप खुश खुश राहायला लागली. आमच्यातला दुरावा कमी होत गेला.

घरी येऊन " I love you" चा वर्षाव होत गेला.

एक दिवस, कॉलेज मध्ये संध्याकाळचा स्टुडंट्स चा प्रोग्राम होता. प्रगती ला बर नसल्यामुळे ती त्यादिवशी आली नाही.

माझ्या नंतर क्लासमध्ये साहिल च लेक्चर होत आणि नंतर हॉल मध्ये प्रोग्राम . तेव्हा तो मला क्लास क्या बाहेर भेटला.

"पवन, मला आज लवकर घरी जावं लागेल. आज माझं लेक्चर तूच घे." हे म्हणत तो निघून घेला. आज टीचर्स मधे फक्त ते दोघच अब्सेंट होते.

माझं ही मन त्या प्रोग्राम मधे लागत नव्हत.
मी मग अर्ध्या मधातून घरी चाललो गेलो.

घरी गेल्यावर जे दिसल त्याने माझं जीवन नष्ट करून टाकल. आमच्या बेडरूम मधे साहिल आणि प्रगती एकमेकात लोळले होते.

मी हा सगळा विचार करत होतो ,तेव्हा माझी नजर माझ्या बेडरूमध्ये गेली. हाच तो बेड होता ज्याच महत्त्व माझ्या साठी खूप होत पण आता मला ती रूम पाहून चीड येत होती.


काही वेळाने सर्वजण जेवायला बसले, जेवताना हॉल मध्ये जशी नजर माझ्यावर माझ्या बहिणीची पडली.अपेक्षा होती की तिच्या डोळ्यातून अश्रू येईल.
पण ती रागात बोलली.

" आई, हा आला या घरात कसा?" मी अशी प्रतिक्रिया पाहून उदास झालो मला वाटल होत की माझी बहिण लगेच मला मिठी घेईल खुश होईल, पण अस पाहून माझ्या लक्षात आलं की आपण चूक केली येऊन. मी उठणार होतो तेव्हा माझ्याकडे आई रडक्या नजरेने पाहत होती.

" पायल, चूप बस इतक्या दिवसान माय पोरग आल आणि तू , बस कर आता?" माझ्या आईला अस रडताना पाहून बेमणाने पायल खाली बसली. दोन मुलं आणि एक मुलगी.

मी ' सुयोग' ला ओळखलं तो आता खूप मोठा झाला होता.

" काय मग ' सुयोग ' ओळखलं का?"
मी हसत त्याला प्रश्न विचारला त्यावर तो 'न' मधे मान फिरवत नाही म्हणाला. आता दहा वर्ष झाली होती मला पाहून कसा ओळखेल तो.

"अरे मी तुझा 'पवन' मामा आहे ."

ऐकल्यावर थोडा खुश होऊन , "खरंच, 'आजी'?." माझ्या आईकडे इशारा केला. आईने 'हो' मधे मान फिरवली.

" मला तर आठवत नाही पण आजी सांगत होती, की लहान पणी मला तुम्ही खूप आवडायचे, मी नुसता तुमच्या काकितच फिरायचो." त्याचा त्या चिमुकल्या तोंडातून हे शब्द येत होते.

सुयोग च बोलण पाहून मला राहवलं नाही गेलं आणि त्याचा डोक्यावरून हात फिरवला. तो हसत खुश झाला आणि शेजारी बसलेल्या मुलाला बोलला.

"प्रणव!" पुढे काही बोलत होताच की तेव्हाच त्याची आई बोलली.

" सुयोग, तुझ्या मामाला विचार इतके दिवस कुठे होता." सुयोग काही तरी बोलत होता हे माझ्या लक्षात आलं, त्याला यावर बाजूला घेऊन माझ्या आईने टोकल.

"ताई मी मुंबईत होतो मी तिथे CA कंप्लीट केल, आता जॉब तिथेच करत असतो."

" होक मग आता कसं काय आला? काय काम आहे." ताई च अस वागणं पाहून मला खूप चिडचिड होत होत . चूक माझी तशी नव्हतीच पण सर्वांनी प्रगतीची बाजू घेतली म्हणून मला घर सोडावं लागलं. पण मला भांडण ही आज करायचे नव्हते.

" मी आईले भेटायला आलो, बाबाच जस माहित झालं तस आलो."

तेव्हाच मधात 'जावई' बोलले.

" बरं , झालं आला तू ,मामी ला कोणी नव्हत जशे मामा गेले तसे, आता तू इथच रहा कुठ जाऊ नको." बाप्पुच्या बोलण्यावरून माझ्या ताईने त्यांना डोळे दाखवले.

" त्याची काही गरज नाही, मी आईला माझ्या सोबतच मुंबई घेऊन जातो. तशीही इथे ती एकटी कशी राहणं." मी नकार देत बोललो


" नाही, मी नाही जात अमरावती सोडून , अन काय आल्या आल्या जाच्या गोष्टी सुचू रायल्या तूले."

मी आज यावर काहीच बोलायचं नाही ठरवून उद्या परवा गोष्ट काढता येते या आशेने गोष्ट बंद केली.

"बर या दोन बाळाच नाव काय आहे ,तुझ प्रणव आणि तुझ " मी त्या दोघांकडे बोट दाखवून विचारलं.

" मी श्रेया सुयोग दादा ची भहिण "

" भहिन होय का तू, सुयोग ची न हे 'महाराज' कोण आहे"

" महाराज?" सुयोग न श्रेया म्हणत हसायला लागले.

प्रणव काहीच बोलला नाही.

" तो प्रणव, शरमते बिचारा जास्त बोलत नाही तो." माझी आई बोलली.

" कौन शरमतो हा, येची माय तर लयच बडबड करते." ताई न माझं बोलण ऐकून मधात बोलण्याचा प्रयत्न केला. तिला मी हे खूपदा चिडवायचो तिच्या बाळतपानाच्या वेळी तिचा कल्ला आमच्या घरात चालूच राहयचा.

प्रणव ने स्वतःबद्दल हे ऐकून ने डोळे वर केले काही तरी बोलण्या साठी ,पण तेव्हा अचानक आई बोलली.

" सुयोग, प्रणव आणि श्रेयाला बाहेर घेऊन जा खेळायला."

मला यांना हे अचानक बाहेर का पाठवलं कडल नाही.जसी ती मूल बाहेर गेली आई बोलली.

"प्रणव तुझाच मुलगा आहे , तुझा आणि प्रगतीचं," हे ऐकून मला सगळ कळायला 2 सेकंद च्या वर लागले. याचा झटका मला सर्वात जास्त लागला.

" काय? माझं मुल , आनी कस काय?"


" ते तुला प्रगतीला विचाराव लागण."

"पण आई, ते माझं कसं असू शकते."

तेव्हाच मधात माझी ताई बोलली.

"बघ आई , म्हटलं होत न जबाबदारी घ्यायची शून्य भर बिन हिम्मत नाही."

"ताई तूझ खूपचं झालं बर, माझा मुलगा कसा असेल तो? मी दहा वर्षापासून इथ आलोच नाही एवढं नाही समजत का तुले" मी चिडून बोललो.

"पण बाळा, प्रगतीला तू सोडून गेला तेव्हा ती प्रेग्नंट होती."आई मधात बोलली.

"होक पण हे भुलत आहात तुम्ही, की मी हे घर का सोडून गेलो? त्याच कारण ही प्रगतीच होती."

"पवन, मी त्यावर काही बोलत नाही ,पण तुला या बद्दल प्रगतीशीच बोलावं लागणं."

" आई कसं काय पण , मला वाटलं होत काही तरी बदलल असणं, पण नाही तू अजून हि तेच करत आहे जे दहा वर्षाआधी केलं होत."

" पवन मी तुला प्रगतीला माफ कर
तिला वापस बायको बनव अस म्हणत नाही पण एकदा तू तिच्याशी बोलून घे."

"आणि यात साहिलला काहीही आपत्ती नाही?,प्रणव इथ येतो म्हणून."

" मी म्हटलं ना हे सगळं तुला प्रगतीशी बोलावं लागल, मी यात काही ही बोलत नाही, तुला वाटायला नको की मी पुन्हा जुळून देण्याचा प्रयत्न करते, मला पुन्हा हरवयाच नाही. तुम्हा दोघांचं जे ही आहे त्यात मी काही ही दखल देनार नाही."

पुढील भाग लवकर येईल ......
तुमच्या प्रतिक्रिये ची वाट बघत आहो.
 
Last edited:
  • Like
Reactions: Lodabetweenboob

hemya

Enchanted Chronicles✨
626
4,357
124
" मी म्हटलं ना हे सगळं तुला प्रगतीशी बोलावं लागल, मी यात काही ही बोलत नाही, तुला वाटायला नको की मी पुन्हा जुळून देण्याचा प्रयत्न करते, मला पुन्हा हरवयाच नाही. तुम्हा दोघांचं जे ही आहे त्यात मी काही ही दखल देनार नाही."

भाग २

" बर मग,कुठे आहे ती त्याला इथेच सोडून?"

एवढं बोलताच सर्वांच्या नजरा चिंतेने व्यापून गेल्या.याचा अर्थ कळायला मला क्षण भर ही वेळ नाही लागला. मी लगेच रागाने आईकडे वडलो.

" आई हे काय आहे? हे जर आधीच माहीत असत तर आलोच नसतो."

एवढं बोलताच आईच्या डोळ्यातून अश्रू येणे सुरू झाले.मी बोलत होतो की तेव्हाच बाहेर मुलांचा गोंधळ अचानक वाढला.

बाहेरचा आवाज ऐकून ताई चिंतेने ताटावरून उठून माझ्याकडे रागाने पाहून बोलली.

" जर तमाशाच करायचं होता तर मग आलाच कशाला ?" हे ऐकून माझा संताप आनखी वाढला, काहीच बदललं नाही? अजून हि सर्व मलाच दोषी ठरवत आहे .जर हे नसत तर , प्रगतीला जवळ ठेवलच नसत.

हा सगळा विचार करत मी रागाने बाहेर जाणारच होतो की माझी नजर दरवाज्यावर उभ्या व्यक्तीवर पडली.

ती दुसरी कोणी नसून प्रगती होती , तिच्या ओढणीला धरून सोबत प्रणव ओढत होता.
तिला पाहून माझ्या आयुष्यातले सगळे चांगले वाईट प्रसंग एकसाथ डोळ्यासमोर आले.
ती सोनेरी पिवळा पंजाबी ड्रेस घालून होती. त्यावर लाल ओढणी तिच्या एक सुकलेल्या शरीरावर झाकून होती.

अस नाही की ती खूपच बारीक होती ती शेवटी पाहल त्या पेक्षा शरीराने आता जाड दिसत होती. आता तीच बाळामुळे ही तीच शरीर फुललं असेल.पण तिच्या चेहऱ्यावर पाहिल्यासारखं तेज काहीच उरलं नव्हत.

लगेच मी माझ्या विचारातून बाहेर आलो आणि लगेच दरवाज्याच्या बाहेर रागाने चालला गेलो.

मागून मला आईचा आवाज आला पण मी न थामता माझ्या कार मधे घुसलो.

आत बसल्या बसल्या अचानक माझ्या डोळ्यात आसवे जमा झाली. काही ही केलं तरी तिला मी अजून हि विसरलो नव्हतो. तिला पाहून माझं प्रेम मला आठवल. पण त्यासोबत तिने दिलेलं दुःख, जे की मी कधीच विसरू शकणार नाही ते ही मनात कोंडून होत.
उर कोणी तरी आतून मुठ्ठी मधे घट्ट पकडुन आहे असा आभास मला होत होता.

गाडी सुरूच करणार होतो की लगेच तिथे प्रगती आली. काचां जवळ उभी राहिेली.मी कंटाळून काच खाली केला.
"काय?" मी रागात बोललो.

" पवन प्लीज , पुन्हा तीच चूक करू नको, हवं असेल तर मी इथून जाते,पण तू नको जाऊ."

तीच बोलण पटलं,हे जर तिने काही वर्षाआधी म्हतल असत तर ही परिस्थिती आलीच नसती.
काही वेळा नंतर मी आत गेलो.
आईने मला आत येताना पाहून डोळे पुसले.

"असा जर पुन्हा रागाच्या भरात निघाला ना तर माझं मेलेल तोंड पाहशील तू"

या बोलण्यावर माझ्या कडे काही उत्तर नव्हत, मला ही माझ्या कृत्याचा थोडा पश्चाताप झाला, मी इथे स्पेशली आई ला भेटायसाठी आलो होतो, माझ्या ताईला जर मी जिवंत असताना आईची काळजी घ्यायचं काम पडत असेल तर माझं आयुष्य निरर्थक आहे.

" अरे तू कुठ चालली?" प्रगती ला बॅग भरतानी पाहून आई म्हणाली.

तेव्हा लगेच प्रगतीन माझ्या कडे पाहिलं.
मला थोडा दोषबोध झाला. यावर आईला ही समजून गेली.

"पवन?"

मी काही न बोलता तिथून एका रूम मध्ये चाललो गेलो.


आलो तेव्हा पासून अस वाटत होत की माझी इथे काही कोणाला गरज नाही. ही माझीच खोली होती. याच रंग बागलेला होता.
ही खोली पूर्णपणे बदलून गेलेली होती. बेड वगेरे,काही गोष्टींचा जागा त्यात काही बदललं नव्हत तर तिथे जवळच माझा आणि प्रगतीचा 'फोटो' होता.
थोड आश्चर्य वाटल पण तेव्हा लगेच आत माझी बहिण आली.

"पवन तू आईच जगणं कठीण करायचं ठरवलंच आहे वाटते , तू इतके दिवस नव्हता तर आई-बाबांची काळजी तिने घेतली, बाबागेल्यावर जर '' नसती तर आईच काय झालं असत याचा विचार ही तू करू शकत नाही. आणि अचानक तू इथे येऊन तिला हाकलून दिलं."

"हो , माझ्या इथून जाण्यात ही माझीच चुकं आहे, प्रगती तर जशी सती-सवित्रीच , सगळी चूक माझीच तीन तर काही केलच नाही."

"पवन तू ही ना, पण तुला घर सोडून जाण्याची गरजच काय होती, यात आमची काय चूक? आम्हा सगळ्यांना एक साधा कॉल ही नाही केला तू."

" मी माझ्या मर्जीने दूर नाही गेलो तुम्ही मला दूर लोटलं, तुम्हा सर्वांनी माझ्यासोबत 'या' सगळ्यांत जशी काही माझीच चूक आहे अशी वागणूक केली, माझा राग थोडासा ही समजून घेतला नाही. मला नुस्त प्रगतीच्या जवळ करण्याचा प्रयत्न केला."

माझी बहीण हे ऐकून शांत झाली. तिच्या मनात थोडा दोशबोध दिसत होता. डोळे खाली करून हळुवार पने बोलली."

"हो, हे सर्व आम्हाला उशिरा कडल, पण आम्ही कधीच तिची बाजू घेण्याचा प्रयत्न नाही केला. फक्त तिच्या एका चुकी मुळे तुमच्या दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचे नव्हते, वरून ती प्रेग्नंट होती, हे आम्ही तेव्हा सांगायचं प्रयत्न ही केला पण तु ऐकलच नाही आणि निघून गेला."

" ताई, ते बाळ माझं नाही" मी नाही मधे मान फिरवून हळुवार पने बोललो.

"प्रणव तुझच बाळ आहे, आणि मी त्या बद्दल काही भांडण करत नाही तो अधिकार प्रगतीचा, तुला एकदा तिच्याशी बोलावच लागेल या बाबतीत."

" साहिल च काय झालं मग?"

"प्रगति ने ती नोकरी कधीचीच सोडली. आता ती एका कपड्याच्या दुकानात काम करते"

"का पण?तिला तर शिकवण आवडायचं"

" खूप काही बदलल , तू निघून गेल्यावर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मला इथेच या बेड वर बेशुद्ध सापडली होती,तिने बाळाचाही थोडासा विचार केला नाही. बर झालं आई न मी तेव्हा घरीच होतो. त्यानंतर तर जास्त न कोणाशी जास्त बोलण, न काही. माझी हस्ती खेळती राहणारी मैत्रीण , एकदम मुरून गेली. तिचा आत्मविश्वास इतका डाऊन झाला की शाळेत शिकवायची पण तिची आता हिम्मत होत नाही."

" इतकी सगळी नाटकं का पण? मी तर तिला नकोच होतो न मग का हा असला अट्टाहास."

माझ्या बोलण्यावर तोंड वाकड करून ताई म्हणाली. "मी ही कोणासमोर डोकस फोडतेय, पण एकदा तिच्याशी बोलून घे तिच्या साठी नाही पण स्वतः साठी."

इतकं बोलून ताई

रूम मधून निघून गेली.

मी ही थोडा आराम करावा म्हणून झोप घेतली.

पुढील भाग लवकर येईल ......
तुमच्या प्रतिक्रिये ची वाट बघत आहो.
 
Last edited:
  • Like
Reactions: Lodabetweenboob

hemya

Enchanted Chronicles✨
626
4,357
124
भाग ३

चिमण्या तलावाकाठी दाने टिपत 'चिव-चिव' करत होत्या.

एक 30 वर्षाचा व्यक्ती तलावा जवळील बागेत बाकावर बसून मुलांना खेळताना पाहत होता.

तेथील झुल्यावर बसण्या साठी बहिण भांड भांडतानी पाहून त्या व्यातीने लगेच डोक्यावर हाथ ठेवला.

"पवन, बसू दे तिला तुझी बहीण आहे न ती? अस भांडत असते का."

दोन्ही हातांनी घट्ट झोका पकडुन पवन बोलला.

"बाबा मग तिला संगांना तिने जास्त झोके घेतले, 20 म्हणत न 25 घेतले, आता मला ही 30 झोके घ्यायचे आहे."
पवन ची बोट त्या झोक्यवरून सोडण्यासाठी पायल पूर्ण जोर लावून ती सोडून पाहत होती.

"बाबा, 25 घे म्हटलं तो ऐकतच नाही आहे.25 घेऊन आनखी घेतो म्हणत आहे."

" बाळा तू घेतले न 25, मग आता तिला घेऊ दे."

" नाही तिने 5 जास्त घेतले तर, मला ही 5 जास्त घ्यायचे आहे."

" बर,पायल तू चाल आपण पाणी पुरी खाऊ घेऊ दे त्याला 5 शिल्लक झोके."

पायल खुश होऊन, आपल्या वडीलाजवळ गेली.
बापलेकी पुढे थोडीशी जात त्या आधी पवन 5 झोके घेऊन पळत त्यांचा पाशी आला.

" काय मग पवन घेतले का झोके?" येवले काका, ज्यांच पणीपुरीचा स्टॉल होता मस्करी करत बोलले.

पवन ने दोन्ही हाथ वर करून 10 आकडा दाखवून पायल ला चिडवल.

अचानक माझ्या जवळ कोणीतरी आल याचा मला भास झाला आणि मी झोपेतून उठलो.

समोर आई बसून होती.माझ्या केसांमध्ये हाथ फिरवत कुरवाळत होती. मला ही आईजवळ किती दिवसांनी असल्याने आनंद झाला.तिच्या डोळ्याखाली पडलेले काळे डाग माझ्या विरहाचे होते की बाबाचे ते आईच जाणे, पण त्यात माझा काही तरी वाटा असेलच याची मला खात्री होती.

काश मी 10 वर्षाआधी सर्व बरोबर रित्या सांभाळलं असतं तर आई-बाबाला इतका त्रास झाला नसता.

आईने डोळ्यात पाहून आनंदाने म्हणाली.

"बाळा, चहा पीत का?"

मी 'हो' मधे मान फिरवली, तशी आई बाहेर गेली मी ही हाथ पाय धुतले आणि आंगणात आलो.

आई सोबत चहा पीत होतो, तेव्हा आईने सांगितलं की, ताई आणि जावई दोन्ही मुलांना घेऊन जावयाचा नातलगांच्या घरी गेले, संध्याकाळी येईल.

मी खूपदा असा आई सोबत एकता बसून चहा पीत होतो. बाबा घरी नसायचे ताई प्रगती सोबत बाहेर असायची, मग आम्ही दोघेच राहायचो या वेळेला खूपदा.आईला ही गोष्ट नक्कीच आठवली असणार.

" पवन्या आठवते, तू पहिल्यांदा चहा बनवला होता अश्याच वेळेस आणि घरी कोणी तरी आलंत, कोण आलत गड्या?.."

" ते जीन्स वाले आजोबा होते.मामाचे सासरे होते वाटते न ते."

"हो, इतके बुडे असून जीन्स घाले माय? त्या दिवशी त्यानले वाटल की चहा मीच केलता, म्हणून काहीच नाही बोलले जाताना म्हणे 'तुमच्या कडे खूपचं वेगळा चहा बनते वाटते'."

" हो, त्यावेळेस चहात मी मीठ टाकल्या गेलत साखरीच्या जागी."

"हो, पण ते ही काहीच बोलले नाही बिचारे, लय गरीब होते,गेले बिचारे ते ही 6 वर्ष झाले जाऊन त्याणले." आई थोडी शांत झाली आणि पुन्हा बोलली. " बाबा बद्दल कस माहित झालं, आम्ही सोडण्याचा खूप प्रयत्न केला,पण तू सापडलाच नाही. बाबाची तब्येत तू गेला तसा खूप खराब झाली सर्वांनी आशाच सोडली होती तू येशील म्हणून फक्त मलाच आशा होती की तू नक्की येशील. कडल कस की बाबांबद्दल."

"काल, ताईची ननदई भेटला होता मुंबईत, जस कळल तसच मी निघालओ" बोलतांना श्वास अचानक बंद होत गेला."आई ,मी एक मुलगा म्हणून निरर्थक निघालो" आणि नाही मधे मान हलवली "नाही आई माझं आणि प्रगतीच जे ही होत त्यात मी तुम्हाला खूप मोठी शिक्षा दिली."

"नाही पवन, जे झालं ते झालं? त्यात सर्वांचीच चूक होती."

चहा पिल्यवर आईला काही तरी बोलायचं होत हे मला समजल.आई मग कप घेऊन उठली आणि पुन्हा परत आली. यावेळेस तिच्या हातात एक कागद होता.

जवळ आल्यावर तो कागद माझ्या कडे दिला.

"आई हे काय?"

"DNA टेस्ट."

मी लगेच त्या कागदपत्रात पाहू लागलो.

"तू गेला तसा, मी सगळा राग प्रगती वर काढला, जो पर्यंत ती हे सिद्ध करून दाखवत नाही की तिचा होणारा मुलगा तुझ बाळ आहे तो पर्यंत तिला या घरात येता येणार नाही, पहिले तर खूप रडली भांडली की कधीच टेस्टिंग होऊ देणार नाही, तिला हे घर सोडून जाता आल असत आपल्या भावाच्या घरी राहली असती पण तिने आमच्या साठी टेस्टिंग ला मंजूर झाली."

मी फाईल पाहीली ,त्यात STR loci,SNP या आकद्या नंतर माझ्या वडिलांची आणि प्रणव ची जन्म तारीख होती, तो जन्मला त्याचं दिवशी टेस्टिंग झाली करण्यात आली.
**.**% आकड्या सोबत दोघेही रेलेटेड असून क्लैमंट चे आजोबा आहेत अस लिहून होत. म्हणजे खरंच प्रणव माझा मुलगा आहे.

" पण ही टेस्टिंग ची मंजुरी कशी भेटली, कोर्टात जावं लागत ना त्या साठी."

"हो आम्हाला ही तेव्हाच कडलं पण तुझ्या बाबाच मित्र एक डॉ. आहे त्याने कॅन्सर होता तुझ्या आज्याला या वरून आधीच कॅन्सर पकडायचा अस जिथे प्रणव जन्मला त्यांना सांगतल आता का ते तुझ्या आज्याचे थोडी कागदपत्र मागतील इतक्या गंभीर गोष्टीवर बाळाला काही होऊ नये म्हनुन जन्मल्यावर लगेच टेस्टिंग करण्यात आली."

मी प्रचंड धक्यामुळे एकदम शांतच झालो.माझा एक मुलगा आहे आणि त्या बद्दल मला काहीच माहीत नव्हत.

ना चांगला मुलगा,ना चांगला नवरा, ना चांगला बाप आयुष्यात मी सगळ्याच ठिकाणी मी अयशस्वी ठरलो.

" बाळा, आम्ही प्रयत्न केला कळवण्याचा की तो तुझाच मुलगा आहे पण नाही भेटूच शकलो. पोलिस कंप्लेंट ही केली, पण त्याच ही काही झालं नाही.तू स्वतःच भेटायचं नाही अस सांगितल्यावर त्यांनी ही काहीच मदत केली नाही."

मी आणखीही शांतच होतो. मी काहीच बोललो नाही.हा माझ्यासाठी जिवणाच्यावरचा धक्का होता.दुपारी जेव्हा आई म्हणाली तेव्हा ही मला हे शक्य आहे अस दुरून ही वाटत नव्हत , पण हे खरं आहे कळल्यावर काय करायचं मला काहीच कळत नव्हत.

पुढील भाग लवकर येईल ......
तुमच्या प्रतिक्रिये ची वाट बघत आहो.
 
Last edited:
  • Like
Reactions: Lodabetweenboob
Top