मुम्बई एअरपोर्टहुन अर्ध्या तासात पोचण्या सारखा एका आडबाजूला असलेल्या एका सोसाईटीत माझ्या मित्राचा बंगला आहे . मी तिथे मुंबईला काम असल्यास जात असे. दुबईला आल्या पासुन मुंबईला महिन्यातून एकदा यावेच लागायचे. कधी काही ऑफिसच्या कामा मुळे तर कधी नुसतीच मजा करायला. ऑफ कोर्स कामानंतर मजा करायला थोडा वेळ असायचाच . मित्राच्या बंगल्यावर रात्री अपरात्री कधीही जाता येत असे . एका आडबाजूला असल्याने तिकडे फार कोणाचे लक्ष नसे. मी असाच बरेच वेळेस त्याच्या कडे जाऊन रात्री आम्ही दोघं गप्पा ठोकून पहाटे झोपत असू . मधे एखादे वेळेस दारू मारून आरामात कधी गाणी ऐकत तर कधी एखादा जुना सिनेमा बघत झोप कधी लागली ते कळत नसायचे. माझी एक तरी फेरी त्याच्या कडे व्हायचीच. पण हे सगळे त्याचे लग्न होई पर्यंत चालले. कुणास ठाऊक पण त्याच्या लग्ना पासून माझे त्याच्या कडे जाणे येणे झालेच नव्हते. त्याच्या लग्नातच मी त्याला त्याच्या बायकोची ओळख करून द्यायला सांगीतले तेंव्हाच त्याने माझी ओळख करून दिली आणि त्यावर म्हणाला की जे काही माझे आहे ते त्याचे देखील आहे. असेच आम्ही आज पर्यंत वागलो आहोत. माझे आणि त्याचे याच विषयावरून वाद व्हायचे. त्याला हे पटत नसे की आता आपण दोघे ही मित्र आहोत आणि आता आपण वेगवेगळे व्यवसाय करतो. तेव्हा मिळकत तुझी माझी एकच आहे म्हणून कसे चालेल. आणि आम्हाला चालले तरी त्याच्या बायकोला कसे चालेल. त्यावरुन आमचे वाद व्हायचे .
आम्ही लहानपणापासून एकत्र होतो .माझ्या आईनेच त्याचा सांभाळ केला त्याचे आईवडील कोण होते ते त्यालाही माहीत नव्हते. एका अनाथ आश्रमाच्या पायरीवर ठेवलेला तो आढळला. तीन महिन्याचा पोर असल्यापासून आईने वाढवला. आई माझी अनाथ आश्रमाची परिचारिका होती. वडील गेले लहानपणी. मला आई होती त्याला आई वडील दोन्हीही नव्हते. माझ्या आणि त्याच्या वयात फक्त काही महिन्याचा फरक असावा . त्यामुळे माझ्या वाढदिवशी त्याचा ही वाढदिवस साजरा होत असे. माझी आई गेल्याचे माझ्या पेक्षाही त्याला जास्त दुखः झाले. त्याचे लग्न माझी आई गेल्या नंतर झाले. म्हणूनच त्याने असे सांगीतले त्याच्या बायकोला की जे त्याचे आहे ते माझं देखील आहे.
तर ह्या विचारांच्या गर्दीत मी केंव्हा त्याच्या बंगल्यावर पोचलो तेच कळाले नाही. विचारांचा ओघात मी इथे कशाला आलो ते सांगायचे राहूनच गेले. मी आज माझ्या मित्राच्या लग्नाला आलो आहे. हे ह्याचं दुसर लग्न .
ह्याच बंगल्यात झालं होतं पहिलं लग्न. लग्न थाटामाटात झालेलं. झाडून सगळे मित्र लग्नाला हजर होते . त्याचे नातेवाईक नव्हतेच पण आम्ही मित्र सगळं पाहात होतो. तेंव्हाच पहिल्यांदा वहिनीला पाहिले मी. सुरेख चेहरा, कुंदकळ्यां सारखे दात आणि दोन्ही गालावर खळी गोरा पान रंग . सर्व गुण ठासून भरलेले. दोष नव्हतेच, दोषाना जागा ही नव्हती. काही म्हणून काही कमी नव्हतं. लग्ना नंतर दोन महिने मी फिरकलोच नाही. त्याना पुष्कळ वेळ द्यावा म्हणून मुद्दाम गेलोच नाही. दोन महिने १२ दिवसानी त्याच्या कडे गेलो. बेल वाजवता क्षणी दार किलकिले झाले. क्षणात वहिनी दारात उभी, पठठा घरी नव्हता. मी वहिनीला म्हटलं
" मी जातो हॉटेल मधे "
तिने माझा हात धरून मला आत ओढले आणि हॉल मधल्या सोफ्यावर गुपचुप बसण्यास सांगीतले टी वी लावून दिला आणि म्हणाली
" तुम्हाला लाज कशी नाही वाटली." मग मी सकपकलो , म्हणालो
" अंsssअं ऑफिसच्या जवळ पडते म्ह..म्हणून....".
" शट अप! उगिच खोटं बोलू नका. तुम्हाला वाटलं काहीही सांगीतलं की मी गुपचुप ऐकून घेईन आणि तुम्हाला जाऊ देईन , मला काय तुम्ही दूध पिणारी लहान मुलगी समजलात."
" नाही तसं नाही पण कशाला उगीच"