• If you are trying to reset your account password then don't forget to check spam folder in your mailbox. Also Mark it as "not spam" or you won't be able to click on the link.

Romance मी ती आणि क्वारान्टीन

Mr. Magnificent

Marathi section king
Supreme
4,921
3,471
144
"नाही, त्यांना इथे ठेवलंच नाही पाहिजे..."

"एवढ्या दिवस तर काही आले नाही आता कश्या वाटा सुचल्या ह्यांना...."
"त्यांना देश फक्त गरजेच्या वेळीच आठवतो...."
आणि तो परत अर्ध्या झोपेतून जागा झाला....
दोन्ही हात अंगाला कवटाळून बसला... ही त्याच्यासाठी खूप अवघड वेळ होती....
त्यावेळी पूर्ण जग अडचणीत होतं...त्या साथीच्या रोगाने हजारो लोकं दिवसाला मरत होते.....

वरद त्याचा बिसनेस एनलिसिसचा अभ्यास इंग्लंड मधून करत होता पण ह्या रोगाने सगळ्याच प्रदेशवासीयांनी आपापल्या देशांकडे वाटचाल सुरू केली होती....
एयरपोर्टजवळच्या चाचणीत तो निगेटिव्ह असूनही त्याला क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितलं होतं....
पण जेव्हा तो घराजवळ आला,तेव्हा शेजारील मंडळी तसेच घरातले काही लोकांनी त्याला विरोध केला....
घरातल्या लोकांचा हा दृष्टिकोन असण्याची कारणं थोडी वेगळी होती....
त्याची आई वयाच्या दहाव्या वर्षीच वारली होती. आणि तेव्हापासूनच तो सावत्र आईच्या सावलीमध्ये वाढला होता....
आणि आजही रक्ताला जास्त किंमत दिली जात असल्याने त्याला खूप काही सोसावं लागलं होतं....

पण त्याचे वडील त्याच्यावर अतोनात प्रेम करत होते....
त्याच्या वडिलांनी त्याला लवकरच हॉस्टेलमध्ये दाखिल केलं...
क्वारांटाईन ही बाब त्याच्यासाठी नवीन नव्हती....
त्याच्यासाठी नवीन होतं ते शेजारच्यांच वागणं....
जी लोकं त्याला किती हुशार आहे,दुसऱ्या देशात जाऊन शिक्षण घेतोय असं बोलायचे ते आज त्याला शिव्या घालत होते, जीवाला लागेल असे शब्दांचे घाव करत होते....
पण तो काही एकटाच ह्या सगळ्यांचा बळी नव्हता...जवळजवळ सगळ्याच बाहेरून येणाऱ्या लोकांना हीच वागणूक मिळत होती....
याच काळात शासनाने एक नवीन निर्णय घेतला, ज्यांना क्वारांटाईनमध्ये घरी जात येत नसेल त्यांच्यासाठी शासकीय वसतीगृह उपलब्ध करून दिलीत....
वरदला एका मुलींच्या वसतिगृहात पाठवण्यात आलं... त्याकाळात सगळे घरी गेले असल्याने ते वसतिगृह इतकंही चांगलं दिसत नव्हतं जेवढं ते चित्रांमध्ये दिसत होतं....
पण तोही रॅमिओ केटेगरीमध्ये मोडत नव्हता, त्याला फक्त दिवस काढण्यासाठी जागा हवी होती,आणि ती मिळाल्यामुळे तो आनंदी होता....
"स्वागत आहे सर", एक 14 वर्षांची मुलगी गेटजवळ उभी होती...
"थेंक यु..."अ तुझं नाव?"
"खुशबू" तीच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती....
त्याने तिच्याकडे हसून पाहिले, कारण ती पहिलीच होती जिने त्याचं भारतामध्ये स्वागत केलं होतं....
"इथे काही प्रोसिजर आहे का?"
"सर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, आणि मग मी तुम्हाला तुमचं रूम दाखवते..."
"तुम्ही इथे खाली राहणार की पहिल्या मजल्यावर?"
"मला खालीच आवडेल..."
ती ऑफिसमध्ये जाऊन एक फॉर्म आणते, ज्यावर एका कोपऱ्यात थोडं लोणचं लागलेलं असतं...
तो फॉर्म हातात घेऊन तो कोपरा बघत असतो...
"अ... माफ करा, चुकून लागलं असेल..."
"इट्स ओके, ही फक्त फॉर्मलिटी आहे बरोबर?"
"अ? हो हो बरोबर..."
"वेलकम टू इंडिया..."तो एक मोठा श्वास सोडत स्वतःशीच पुटपुटला....
ते शासकीय वसतिगृह फक्त दोन मजल्यांचे होते. आणि बाकीच्या वसतीपासून लांब होते...याचे दोन कारणे असू शकतात... की ते वसतिगृह मागासवर्गीय मुलींचे होते किंवा मग शासनाला मागासवर्गीय मुलींच्या आरोग्याची काळजी असल्याने त्यांचे वसतिगृह प्रदूषणरहित ठिकाणी होते....
"ह्या बाजूने..." तिने हात पुढे करून दिशा दाखवली...
आत जाताच ती डोक्यावर हात ठेवून म्हणाली, "अरे देवा, मी तुमचा फॉर्म बाहेरच ठेवला वाटतं... मला उंदरांच्या पहिले तो फॉर्म घेऊन कपाटात ठेवावा लागेल...मी आत्ता आले..."
" अगं पण रूम नंबर?" त्याचा प्रश्न पूर्ण होण्याआधीच ती निघून गेली होती....
"ठीक आहे, मीच शोधतो..."
आणि तो रूम्सच्या दिशेने जाऊ लागला...
"मुलींच्या दिसण्यात आणि राहण्यात किती हा विरोधाभास...आम्ही मुलं तरी ह्यापेक्षा रूम्स नीट ठेवतो..."
तो दरवाजातून डोकावून पाहत होता आणि पुढच्या रूमकडे जात होता...

असंच एका रूममध्ये त्याला ए4 साईझची फोटोकॉपी कोपर्याच्या भिंतीवर दिसली...
ती वाचण्यासाठी तो आत शिरला...
"Be stronger then your strongest excuse"
Te नेटवरून डाउनलोड केलेलं एखादं पोस्टर वाटतं होतं...
ज्याची ब्लॅक एन्ड व्हाइट फोटोकोपी त्या मुलीने भिंतीला लावली होती....
खिडकीच्या जवळच एक छोटं मनी प्लांट होतं आणि त्याला लागून एक कागद...ज्यावर लिहिलं होतं, "माझी आई घरी गेली आहे, मला थोडं पाणी द्याल का?"
"हो... का नाही?" नकळत त्याच्या तोंडून निघालं... आणि त्याने त्याला थोडं पाणी दिलं...
तेवढ्यात खुशबु तिथे येते, "सर, तुम्ही इथे... मला वाटलं वरच्या मजल्यावर गेले का काय? तुमचा रूम हा नाही आहे...तुमचा रूम नंबर2 आहे..."
"खुशबू माझं प्लिज एक काम करशील... मला इथे राहायचंय... तेवढा रूम नंबर चेंज कर प्लिज..."
"हो ठीक आहे करते... पण ह्या रूममध्ये असं काय आहे?..."
तो मनी प्लांट कडे पाहून बोलला..."Maybe मला इथे एकटं वाटणार नाही"

"ठीक आहे मी चेंज करते...जेवणासाठी ती थाळी वापरा, इथे जी मुलगी रहायची मही ताई तिचा हा बेड आणि हे सामान आहे...जेवण ७.३०वाजता सुरू होईल तेव्हा ही थाळी घेऊन या, पण धुवून आणा बरं..."ती हसत म्हणाली..
त्याने हसून मान हलवली...त्याला हे ठिकाण नवीन भासत नव्हतं... तिथे सामान ठेवण्यासाठी कपाट नव्हते...
हॉस्टेल त्यांना एक बेड आणि स्टूल देत असायचं...असा त्याने अंदाज लावला...
तो सामान ठेवण्यासाठी खाटेच्या खाली पाहू लागला तर तिथे आधीच खूप गर्दी होती...दोन मोठ्या सुटकेस आणि अस्तव्यस्त पडलेली पुस्तके...
"गर्ल्स..." तो थोडं नाराज होऊनच उद्गारला...
तो सगळी पुस्तकं नीट लावू लागला, पुस्तकांवरून कळत होतं की जाताना ती खूप घाईत होती...
"पण तरीही मनि प्लांट जवळ कागद ठेवायला ती विसरली नाही..." तो स्वतःशीच हसून बोलला...
जवळजवळ सगळीच पुस्तके लायब्ररीतले होते..
"पण लायब्ररी एका वेळेस 4 पुस्तके देत असेल,जास्तीतजास्त 5...हिच्याकडे एवढे 35 पुस्तके लायब्ररीतले कसे?..."
पुस्तकांमध्ये मानसशास्त्र, प्रेमकथा, सामाजिक तर बाकी अभ्यासावर होते...अभ्यासाच्या पुस्तकांकडे बघून ती एमसीए करत आहे, असा त्याचा अंदाज झाला...
पुस्तके लावताना त्याचं लक्ष तिच्या डायरीकडे गेलं...
आणि त्याच्यासमोर त्याच्या शाळेतली शिक्षिका उभी राहिली, "वरद, आपण कधीच दुसऱ्यांच्या गोष्टींना हात नाही लावला पाहिजे"
ती एकच शिक्षिका होती जी त्याच्या बुद्धिमत्तेपलीकडे त्याच्या निर्मळ मनाबद्दल विचार करायची....
मग त्याने डायरी कोपऱ्यात ठेवून दिली आणि स्वतःच सामान बसेल एवढी जागा केली....
सगळं नीट ठेवून त्याने बेडवर उडी घेतली...
उशीच्या जवळच तिने बायबलचे वर्सेस लिहिलेले होते....
आणि तो ते वाचता वाचताच झोपी गेला....
थोड्यावेळाने दारावर बसलेल्या थापेमुळे त्याला जाग आली...
"कोण आहे?"
"मी खुशबू..."
"बाळा दोन मिनिटं थांब.. " त्याने अंगावर शर्ट चढवला आणि दरवाजाकडे आला....
"दार उघडायला एवढा वेळ का लागला?"
"मी झोपलो होतो..."
"बर झालं मग मी लवकर आले नाहीतर तुम्ही जेवायलापण उठले नसते..."
"जेवण्याची वेळ तर 7:30 आहे ना?"
"हो मी इथे कामासाठी आले होते..."
"अगं राणी....मग लवकर सांग ना...कसलं काम?"
"मी राणी सारखी दिसते?" तीने केसं उडवत विचारलं...
"हो... तू खूप गोड दिसतेस..."
"पण मी विसरले की मी नेमकी आले कश्यासाठी होते.."तिने जिभ हळूच चावली....
आणि तो काही बोलण्याच्या आधीच ती निघून गेली...
तिच्याकडे बघून त्याला त्याच्या सावत्र बहिणीची आठवण येत होती...ती नीट असावी याबाबत त्याला काळजी होती....
तेवढ्यात त्याचा फोन वाजला...
"हॅलो बाबा..."
"हॅलो... तू नीट पोहोचलास ना?..रूम वैगरे नीट आहे? तिथे सगळ्या सुविधा आहेत का?"
"हो बाबा...इथे सगळ्या सुविधा आहेत... तुम्ही स्वतःची काळजी घ्या..मला , निकीला, गौतमला तुमची गरज आहे..."

"वडील मी आहे पण वडिलांसारखा तू बोलायला लागला...लवकरच भेटुयात आपण.... काळजी घे... आय लव यु बाळा..."
"तुम्हीही गौतम आणि निकीताची काळजी घ्या..."
"हो... बाय"
"बाय"
त्याने रडक्या आवाजात फोन ठेवून दिला...
रुममधला बल्प कमी वॅटचा असल्याने प्रकाश कमी होता,पंख्याचा आवाज होता,तिथे ना गिझर होतं नाहि शॉवर...
जवळजवळ सगळंच विस्कळीत होतं... पण त्याच्या आयुष्याच्या मानाने नक्कीच चांगलं होतं...
जेवणाच्या ताटावर धूळ बसलेली होती...तो साबण शोधू लागला... पण भांडे घासण्यासाठी त्याला काही मिळत नव्हतं...
तिच्या स्टुलच्या खाली त्याचं लक्ष गेलं...तिथे त्याला सगळे साबण, कोलगेट असं सगळं एका बाजूला ठेवलेलं दिसलं...
"अच्छा, पार्टिशन होय...
चांगलं आहे... पण मिस.मही मला तुमची भांडी, साबण, गोधडी,बेड सगळं वापरावं लागणार आहे... बदल्यात मी तुमच्या मनी प्लांटला रोज पाणी देईल असे वचन देतो..."
त्याने हसून डिशवोशर उचललं आणि ताट धुतले...
खुशबू मेसच्या दरवाजात उभी होती, "सगळ्यांच स्वागत आहे" ती उत्साहाने म्हणाली....
एकूण 15 लोकं तिथे पोहोचले होते.आणि सगळे एकमेकांकडे पाहून आनंदी दाखवण्याचा प्रयत्न करत होते....
"हार्ड टाइम बडी..." एक माणूस वरदच्या शेजारी येऊन बसला...
"नॉट एक्साक्टली... लाईफ हेस बिगर प्रॉब्लेम्स देन दिस फॉर मी..."
"लवली..." तिसरा मुलगा जय त्यांच्या जवळ बसला...
"तुम्ही कुठून आले आहेत?"
"जर्मनी..."
"स्टील अवर डेस्टिनी टुक अस हियर..." तो हसून बोलला...
"ही भाजी कोणती आहे?"
"अ... फ्रेंच बिन्स वाटत आहेत..."
"मी तर पहिल्यांदा पाहिलेत..."
"पण हे आरोग्यासाठी चांगले असतात..."
"आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी पण..."
तिघांनीही एकमेकांकडे पाहिले आणि हळूच हसले...
"अह... वाचवा प्लिज..."
तो परत त्याच स्वप्नाने खडबडून जागा झाला....
"मी एवढं काय कोणाचं वाईट केलंय की मला रोज हे असं भोगावं लागतं..."
त्याने दोन्ही हाताने चेहरा झाकला...
खूप वेळपर्यंत तो एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर जात राहिला...
"डन... आय एम नोट ट्राइंग..."
तो बेडवर उठून बसला...
त्याला मोबाईल कधी जवळचा वाटत नव्हता...म्हणून तो खिडकीच्या बाहेर डोकावू लागला...
बाहेर दाट अंधार होता...
"एकदम माझ्या आयुष्यासारखा अंधार..."तो स्वतःशीच पुटपुटला...
"डायरी" त्याच्या मनात परत डायरीचा विचार आला...
त्याने लाईट लावली आणि ती कोपऱ्यातली डायरी उचलली आणि बेडवर बसला...
"सॉरी मिस. पण खूप एकटं वाटतंय..." आणि त्याने डायरी उघडली...
पण त्यावर काहीच लिहिलेलं नव्हतं...
त्याचा चेहरा परत उदास झाला...
बघता बघता त्याला कळालं, तिने मागच्या पानापासून लिहायला सुरुवात केली होती...
"प्रिय मैत्रीण...
मला माहित नाही मी मागची डायरी एवढ्या लवकर पूर्ण कशी केली? पण मला तुझ्याशी बोलायला आवडतं... कारण तू मला बोर समजत नाही...तुला ही मी आवडते.. बरोबर ना?"
त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं...
तो पुढे वाचू लागला...
"तुला माहितीये आज काय झालं? आज जेवणात झुरळ होतं..."
त्याने लगेच त्याच्या पोटावर हॅट ठेवला आणि त्याला क्षण आठवला जेव्हा जय म्हणाला होता की, "डाळ छान आहे ना इथली..."

"पण मी कोणालाच काहीही सांगितलं नाही...माईंना बरं वाटत नव्हतं... आणि जर मी सांगितलं असतं तर त्यांना खूप बोलणे खावे लागले असते... म्हणून मी ते झुरळ हळूच बाजूला काढलं आणि गपचूप डाळ खाल्ली..."
"स्टुपिड गर्ल" त्याने पुढचं पान काढलं...
"मी आज 14 रिकाम्या दारूच्या बाटल्या रस्त्याच्या कडेला पाहिल्या.... आणि तुला तर माहितीये इथे घंटागाडी किती वेळा येते... मला खरं कॉलेजला जायचं होतं पण मग मी त्या सगळ्या बाटल्या होस्टेलला आणल्या... त्या साफ केल्या... आणि सगळ्यांमध्ये एक एक मनी प्लांटची फांदी घातली... आणि मग माझ्या कॉलेजच्या सगळ्या मित्रमैत्रिनींना भेट म्हणून दिल्या....
एक बाटली लायब्ररी मध्येही ठेवली... खूप छान दिसतील हे काही दिवसांनी...
आणि सगळ्यात सुंदर मनी प्लांट आपल्या इथे ठेवलं... बघना किती छान आहे हे... तुला माहितीये हे माझ्याशी बोलतं.. मी बोललेलं ऐकतं... रुममधल्या मुली मला हसल्या पण खरोखर हे खूपच सुंदर आहे..."
त्याने हसून डायरी बंद केली आणि मनी प्लांटकडे पाहिलं...
"सो, मिस्टर प्लांट... आय केम टू कनोव देट यु लाईक टू टोक.. कॅन वी? फॉर समटाईम?"
"लेट मी टेल यु अबाउट माय सेल्फ... आय होप देट आय एम नोट डिस्टरबिंग युअर स्लिप...
..................."
मोबाईलच्या आवाजाने त्याला जाग आली...आणि तो जागा होण्याच्या आत मोबाईल बंद झाला...
डोळे चोळून त्याने घड्याळाकडे पाहिले...
"१० वाजले" त्याला स्वतःवरच आश्चर्य वाटत होते...
"मी एवढया वेळ झोपलो होतो...येस..."
त्याचं लक्ष मनी प्लांटकडे गेलं...
"गुड मॉर्निंग मिस्टर. प्लांट... तुमच्या कृपेने मला खूप छान झोप लागली....आणि तुमच्या आईलाही धन्यवाद.."
त्याने हसून त्याला पाणी टाकले...
"ही दिसत कशी असेल?" नाश्ता करताना त्याच्या डोक्यात प्रश्न आला...
"कोण कशी दिसत असेल?" जयने उत्सुकतेने विचारले...
"मही..."
"कोण मही?"
"अरे हळू...तुझा आवाज सगळ्यांना ऐकू जाईल आणि मग आपल्याला इथुनपन हाकलून लावतील....
"जिच्या रूममध्ये मी राहतोय, तीचं नाव मही आहे..."त्याने दबक्या आवाजात सांगितले...
"अच्छा...पण तुला तिचं नाव कसं कळालं?"
"अ ...पुस्तकांवर होतं..."
"हुशार आहेस रे तू.... आल्या आल्या चालू ही झाला..."
"ते सोड... तो काल आपल्या सोबत बसला होता तो आला नाही अजून नाश्त्याला?.." वरदने विषय बदलण्यासाठी विचारलं...
"तो... त्याचं नाव विकी आहे... आणि त्याचे चोचले वेगळे आहेत... रात्री विडिओ कॉल चालू असेल, सकाळी उठला नसेल..."
"असंय का?...."
"हो... दिसतो तसा नाहीये तो,पक्का चालू आहे..."
"तसा तू ही खूप साधा दिसतो रे जय..."
"ए चुतीया..."
जेवण करून ते परत आपापल्या रूममध्ये गेले....
त्याने परत डायरी वर काढली...
" मला माझे मित्र सहलीला चलतेस का? म्हणून विचारत होते...पण तुला तर माहीत आहे
ना मैत्रीण,माझ्याकडे पुस्तकं घेण्यापूरते पैसे नसतात कधीकधी..."
त्याला वाचून दुःख झालं....
"मी वर्गात पहिली आले.... माझे शिक्षक खूप खुश होते...
आणि मग मी आज माझ्या आयुष्यातली पहिली पार्टी दिली...
त्या ज्या आमचे वर्ग झाडून घेतात बघ त्या सरला मावशी,कमला मावशी, सरोदे मावशी यांना....
तुला माहितीये, मला एवढे चांगले मार्क त्यांच्यामुळेच पडले,मी प्रत्येक पेपरला त्यांच्या पाया पडायचे...इथे आई नाहीये ना....एकदा माझ्या मित्राने मला पाया पडताना पाहिलं आणि विचारलं तूझे नातेवाईक आहे का?म्हटलं हो...सगळेच्या सगळेच माझे नातेवाईक आहे....
ह्या मावश्या मला काळा चहा आवडतो त्यामुळे सकाळी सकाळी चहा बनवताना मला बोलावून घ्यायच्या आणि मला पहिले चहा द्यायच्या... मला कधीही आईची कमी भासु नाही दिली त्यांनी....
माझ्या मेसची मावशीपण खूप चांगली आहे...पेपरला तिच्याही पाया मी रोज पडायचे...
इथे आल्यापासून आईपासून लांब आहे पण इथे मला प्रत्येक स्त्रीमध्ये माझी आईच दिसते...."
त्याने डायरी बंद केली...
"मी रोज आईच्या सावलीसाठी रडत होतो पण कधी ती शोधण्याचा प्रयत्न केला नाही आणि ही मुलगी....."
"तो प्रत्येक पानावर तिच्यासोबत जगत होता... ती त्याला जगणं शिकवत होती आणि तो शिकत होता....
तिच्यासोबत हसत होता,तिच्यासोबत रडत होता... तिचं म्हणणं ऐकत होता आणि मधूनच तिच्या विचारांमध्ये मग्न होत होता...."
त्याचा एकटेपणा मिटवायला डायरी,मनी प्लांट बाकीची पुस्तकं त्याला मदत करत होती....
ताटात जेवताना "ती ह्याच ताटात जेवत असेल"
झोपताना "ती कोणत्या कुशीवर झोपत असेल?"
ह्याच विचारांनी त्याच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली होती...
आता मही फक्त एक मुलगी नव्हती.... त्याच्या जगण्याची प्रेरणा होती....तो नकळत तिच्यावर प्रेम करायला लागला होता......
"आजची ताजा खबर, लोकडाऊन अजून 15 दिवसांनी वाढले" जय वरदच्या शेजारी येऊन बसला...
"Shitt"
"तुला काय झालं? मस्त खातो,पितो ,झोपतो आहे..."
"जय, मित्रा मी किती दिवस तिला फक्त वाचत राहणार किव्वा तिच्याबद्दल फक्त विचार करणार...
मला तिला प्रत्यक्षात बघायचं आहे, तिचे डोळे कसे आहे? तिचे केस किती लांब आहेत? ती बोलताना कशी बोलते, कशी हसते? मला सगळं अनुभवायचं आहे... आणि लोकडाऊनमुळे सगळं अशक्य आहे..."
"तू म्हटला होतास की तीचं नाव तुला पुस्तकांवरून कळालं बरोबर?"
"हो"
"मग तिचं पूर्ण नाव शोध आणि सोशियल मीडियावर तिला सर्च कर ना..."
"डॅम... ही आयडिया माझ्या डोक्यात का नाही आली?"
"कारण मित्रा माणूस प्रेमात आंधळा, मूर्ख, बधिर सगळंच होतो..."
"थँक्स जय... बाय..."
"अरे.... जेवण तर संपव..."
"रूममध्ये जाऊन खाईल... बाय..."
"हा तर खपला बॉस..."
तो रूममध्ये येऊन जेवणाची थाळी स्टुलवर ठेवतो आणि पुस्तकांमध्ये तिचं नाव शोधू लागतो....
नाव मिळाल्यावर ते पहिल्यांदा फेसबुकवर टाकतो...
आणि प्रोफाइल बघतो...
कॉलेजच्या नावानुसार त्याला तिची प्रोफाइल मिळते...
"येस..."
पण त्याचा आनंद अगदी दोन मिनिटांचा असतो,तिने एकही फोटो पूर्ण चेहऱ्याचा टाकलेला नसतो...कुठे फक्त डोळे,कुठे सावली....पण तरीही ते फोटो पाहून त्याला वेगळाच आनंद झालेला असतो....
पण तिच्या प्रोफाईलला तिचे दुसरे सोशियल मीडिया अकाउंट्स लिंक असतात... आणि तीचं एक "दिल से" नावाचं फेसबुक पेज असतं...
त्यावर खूप छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या असतात....
"-Other gf's take their mate to watch romantic movies and you took me for horror movie...you are so unromantic...
-Hello...I find this more romantic when you hold my hands out of fear....."
आणि तो वाचून जोरजोरात हसायला लागतो....
"हि खरोखर वेडी आहे..."
मग तो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर जातो, इथेही तिचे सगळे अर्धवट चित्र असतात...पण इथे ती ऍक्टिव्ह आहे हे पाहून त्याला आनंद होतो....
आणि तो तिला मेसेज करतो...
"Hey, I am varad...
I am living in your hostel...."
तिकडून खूप वेळ काहीही रिप्लाय येत नाही...
म्हणून तो मोबाईल बाजूला ठेवून जेवणाचं ताट जवळ घेतो....
"Hello Varad...
मी मही...
तिथलं वातावरण कसं आहे? खुशबू आणि मेसच्या मावशी नीट आहेत ना?"
"तुला मेसेज मी केला आणि तू मला विचारलं पण नाही..."
"SOrry हा... तू कसा आहेस?"
"मी एकदम मजेत.."
"आणि खुशबू आणि मावशी?...."
"हो गं बाई... ते ही नीट आहेत...."
"माझं एक काम करशील का प्लिज?"
"हो... बोल ना.."
"माझ्या रूममध्ये एक मनी प्लांट आहे...त्याला तू जोपर्यंत तिथे आहेस, पाणी घालत जाशील का?"
"मी त्याला रोज पाणी देत आहे....."
"आणि तुला कसं काय वाटतंय होस्टेलचं जेवण?"
"छान आहे...."
"एक काम कर... माझी हिरव्या रंगाची बॅग आहे खाली...ती उघड बरं..."
"तुझ्या दोन्ही बॅग्स ला कुलूप आहे...."
"हिरव्या बॅगला नाही आहे...तुटलंय... पण ते कळून येत नाही...घे पटकन बाहेर..."
"थांब हा..."
तो बॅग बाहेर घेतो...
"बघ त्यात शेंगदाणे, बदाम,बिस्किटे, चिवडा सगळं आहे खाण्यासाठी..ते तू घेऊ शकतो...."
"तू कुलूप का लावून ठेवलय मग?"
"ते कसं आहे... त्यात माझं मेकअपच सामान आहे...कानातले, नाकातले, गळ्यातले..त्याचा तुला काही फायदा नाही म्हणून मला भीती नाही...तू खाण्याच्या गोष्टी बाहेर घे आणि खा... कारण लोकडाऊनमुळे तुम्हालाही बाहेर जाता येणार नाही ना..."
"थँक यु..."
"अजून काही लागलं तर मला कळव...."
आणि ती ऑफलाईन गेली...
त्याला तिला बघण्याची मनापासून इच्छा होती...
त्याने दुसऱ्यादिवशी तिला मेसेज केला...
"आपण विडिओ कॉल करू शकतो का?"
"का बरं?"
"अगं मी तर तसा आहेच तुझ्या मनी प्लांट जवळ पण असं वाटत होतं की एकदा तु पण थोडं बोलावं ..."
"अं... चालेल..."
"असं कर 11.45 ला विडिओ कॉल करूयात... तू कॉल लावून दे आणि जेवायला निघून जा... मी थोड्यावेळ बोलेन आणि फोन कट करेल...
ठीक आहे?"
ही मुलगी खूपच हुशार आहे...
"ओके ठीक आहे..."
आणि तो इन्स्टाग्राम मधून बाहेर येऊन स्क्रीन रेकॉर्डिंगच्या युट्युबवर विडिओ पाहू लागला.....
आणि त्या प्रमाणेच त्याने स्क्रीन रेकॉर्डिंगला लावून विडिओ कॉल चालू केला....
आणि त्याला ती पहिल्यांदा दिसली....
सावळा वर्ण,सुंदर चेहरा, मोठे केसं... तो काही बोलण्याच्या आत ती त्याला म्हणाली...
"हाय वरद... "
"हाय मही.... तू खूप सुंदर आहेस..."
ती हसली...
"अच्छा....फोन मनी प्लांट जवळ ठेव आणि जेवायला जा नाहीतर उशीर होईल..."
"हो जातो...."
आणि तो जेवायला निघून गेला....
जेवतांनाही हसताना तिच्या चेहऱ्यावर आलेले केसं, तिची खळी, तिचे डोळे लहान करणे त्याच्या डोक्यातून जायला तयार नव्हते....
जेवण झाल्यावर जेव्हा तो रूममध्ये आला तोपर्यंत कॉल कट झाला होता....
त्याने लगेच विडिओ रेकॉर्डिंग ऐकायला सुरुवात केली....तिचं ते प्रेमळ बोलणं ऐकून दगडालाही पाझर फुटेल तर ते तर झाड होतं....
त्याने ती व्हिडिओ जवळजवळ 50 वेळा पाहिली असेल पण तरीही त्याचं मन तिच्यातून बाहेर निघायला तयार नव्हतं....
त्यानंतर त्यांचं बोलणं वाढलं होतं... आता कधीकधी विडिओ कॉल वरदसाठीही यायला लागले होते....
त्याच्या आयुष्यात एक नवीन ज्योत दिसत होती....लोकडाऊन सम्पल्यानंतर सगळ्यांच आयुष्य बदलणार होतं पण त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं होतं....
लोकडाऊन सम्पल्यानंतर जेव्हा मही तिच्या होस्टेलला परत आली तेव्हा ते बदललेलं वातावरण तिलाही काहीतरी सांगत होतं....
आज ती खूप दिवसांनंतर तिची डायरी लिहिणार होती...डायरी उघडल्यावर तिला जाणवलं की तिच्या डायरीचे पहिले पानं सुदधा भरलेली होती....
त्या पानांवर त्याने लिहिलेलं होतं....
"पहिले रूम, मग ताट, मग बेड आणि डायरीपण....
जर अजून काही दिवस राहिला असता तर माझ्या दोन्ही बेग्स सोबत नेल्या असत्या..."
ती स्वतःशीच हसली....
तिने वाचायला सुरुवात केली... त्यातला प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर त्या वेळीच्या तिच्याबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त करत होते....
तिला काय बोलावं, कळत नव्हतं पण ते सगळं तिच्यासाठी एक वेगळंच विश्व निर्माण करत होतं....
शेवटच्या काही ओळींनी तिला कोड्यात टाकलं...
"आई नसल्यामुळे माझी काळजी लहानपणी आजी घ्यायची, आजी मला नेहमी गोष्टीत सांगायची की एक परी असते जी आपल्याला प्रत्येक गोष्टींमधून वाचवते, मी त्या परीची खूप वाट पाहिली होती पण कधी वाटलं नव्हतं की ती मला इथे भेटेल....तुझ्यासोबत हे जेलसुद्धा सुंदर वाटलं....मला तुझ्यासोबत माझं पूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा आहे परी!
"Will you be my Quarantine?....."
आणि तिने पटकन डायरी बंद केली....
काही वेळाने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक मेसेज आला,
"Yess...."
 
Top