लहानपणी तो दर उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जायचा. आठवीत गेल्यापासून वेगवेगळे क्लासेस त्याच्या मागे लागले आणि मामाचा गाव त्याच्यासाठी जणू कायमचा बंद झाला. कायमचा बंद म्हणजे सातवीनंतर अगदी इंजिनीअरिंगची शेवटची परीक्षा देईपर्यंत त्याला मामाच्या गावी जाणं झालं नाही. आता पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला जाणार होता. मग तीन चार वर्षे तरी तो परत येणार नव्हता. म्हणून आजीला भेटण्याचे निमित्त झाले आणि आज तो मामाच्या गावाला निघाला होता. लहानपणी त्याला किती उत्सुकता असायची मामाच्या गावाबद्दल. तेव्हा मामाची दोन मुलं आणि तो सकाळी ऊन पडेपर्यंत क्रिकेट खेळायचे तिथून तसेच विहिरीवर पोहायला, तिथून आलं की ऊन खाली होईपर्यंत मामाच्या मिठाईच्या दुकानात बसून मधूनमधून कशावरतरी ताव मारत राहायचं संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांबरोबर बागेत हुंदडायला जायचं! पण आता काय करायचं दिवसभर हा विचार त्याच्या डोक्यात फिरत होता. ह्या विचाराच्या तंद्रीतच असतानाच त्याची बस अनंतपूरच्या बसस्थानकात शिरली. अमोल फलाटावर उभाच होता. बसमधून तो उतरताच अमोल त्याच्याजवळ आला. दोघांनी मिठी मारली व इकडच्या तिकडच्या गप्पा मारत दोघे अमोलच्या गाडीवर बसून दोघे घराकडे निघाले. गावात खूप बदल झाले होते. वर्दळही बरीच वाढली होती. ते मामाच्या घरी पोचले. मामाचं घर अनंतपुरच्या अगदी मुख्य बाजारपेठेत होतं. खाली भलंमोठं मिठाईचं दुकान आणि त्याच्यावर दोनमजली घर. दुकानासमोर गाडी लाऊन ते दुकानात शिरले. मामी दुकानात बसल्या होत्या. त्यांना नमस्कार करून ते दोघे वर गेले. मामा दुपारचं जेवण करून झोपला होता आजी कुणाबरोबर तरी गप्पा मारत बसली होती. अमोल त्याला घेऊन वरच्या खोलीत गेला.
” दुकानाचा पसारा बराच वाढलाय रे अमोल! ” तो
” अरे दादा, आपलं काही डोकं चाललं नाही अभ्यासात कसाबसा दहावी बारावी झालो. तेव्हाच ठरवलं दुकानातंच लक्ष घालायचं अभ्यास वगैरे आपलं काम नाही. मग वाढवलं हळूहळू. ऍडमिशन घेतलं बीकॉम ला आता फक्त परीक्षेला जातो. फर्स्ट इयरलाच लुडकलो एकदा पण यंदा सुटेल आता. ” अमोल
” असुदे काही फरक नाही पडत अटलिस्ट धंदा तरी नीट करतोयस ना मग बास आहे. ” तो
” ऐक ना राजूदादा, मी जातो आता दुकानात तू फ्रेश हो, हवा असेल तर आराम कर थोडा, नाहीतर ये खाली. बाबा चार वाजता येतात खाली मग माझी सुट्टी होते मग जाऊयात आपण बाहेर. ” तो बोलता बोलता निघून गेलासुद्धा!
तो फ्रेश होऊन आला. बाहेर बाल्कनीत येऊन निरीक्षण करू लागला. आजूबाजूची दुकानंही खूप मोठी झाली होती. तो जेव्हा लहानपणी यायचा तेव्हा त्याचे इथे खूप मित्र झाले होते पण केतनदादा सोडून त्याला कुणीही आठवत नव्हतं. केतनदादा म्हणजे मामाच्या दुकानाच्या अगदी समोर असलेल्या भुसेकाकांचा मुलगा. तो त्याच्यापेक्षा एक वर्षाने मोठा होता. तो त्याला शोधू लागला पण तिसऱ्या मजल्यावरून त्या दुकानातलं काहीही दिसेना. तो खाली दुकानात जाऊ लागला तोच आजीने त्याला बोलावलं. तो गेला
” कोण हो हा मावशी? ” आजीसोबत बसलेल्या बाईने आजीला विचारलं.
” आमच्या सुमीचा थोरला. राजवर्धन! अहो राजू आठवत नाही का तुम्हाला? लहानपणी यायचा ना! ” आजी
” अगं बाई! केवढा मोठा झालाय! ओळखलं का रे मला? ” त्या काकू बोलल्या. त्याला आठवेना
” अरे केतनची आई… भुसे काकू आहेत या. आहेत का लक्षात? ” आजी
” ओ. काकू केतनदादा कुठे असतो आता? ” तो
” कुठे जाणार तो. दोन वर्षांपूर्वी काका गेले. तेव्हापासून दुकान संभाळतोय. तो आणि अमोल दुकान सांभाळत सांभाळत कॉलेज करतात. भावसारखे राहतात अगदी. तुमच्या घराचा तर आधार आहे आम्हाला. तरी बरं यांनी स्वातीचं लग्न लवकर करून दिलं होत. नाहीतर आमचं काय झालं असतं देव जाणे! ” काकू डोळे पुसत म्हणाल्या.
” रडू नका हो. देव पाहत असतो सगळं! त्याला काळजी असतेच! ” आजी
” बरं तू काय करतोस बाळा? ” काकू
” मॅकेनिकल इंजिनिअर झालो मागच्या वर्षी आता पुढच्या महिन्यात अमेरिकेला चाललोय पुढचं शिकायला! म्हटलं आजीला भेटून जावं ” तो
” वावावा! छान हं बाळा! असाच मोठा हो ” काकूंनी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरून बोटं मोडली.
” बरं काकू, आजी मी जाऊ खाली? केतनदादाला भेटतो जरा. ” असं म्हणून तो उठला. इतक्यात एक तीन चार वर्षाचा मुलगा आजी आजी हाक मारत वर आला!
” अगं बाई! आली वाटतं स्वाती! समर्थचा आवाज हा! ” काकू
तो मुलगा तिथे येऊन उभा राहिला.
” आजी चल ना घरी आम्ही आलोय! ” तो काकूंना म्हणाला.
” चल चल जाऊया हं बाळा! बर मावशी मी येते हं! आणि राजू तुही चल माझ्याबरोबर स्वातीताईही आलीय आता. ” असं म्हणत काकू उठल्या.
तो, काकू आणि त्यांचा नातू पायऱ्या उतरून खाली आले.
त्यांच्या दुकानासमोर एक कार थांबली होती. बहुधा काकूंचे जावई असावेत ते गाडीतून बॅगा काढत होते व एक तीस पस्तीस वर्षे वयाची बाई दोन बॅग हातात घेऊन पायऱ्या चढताना त्याला पाठमोरी दिसली. बहुतेक केतनदादाची मोठी बहीण स्वाती होती ती.
” काकू मी थोड्या वेळाने येतो! ” तो काकूंना म्हणाला.
” बरं! पण नक्की ये हं! ” काकू निघून गेल्या.
अमोल दुकानात व्यस्त होता. तो अमोलला मदत करू लागला. भुसे काकांचं घरही अगदी त्याच्या मामासारखंच होतं. खाली दुकान आणि वर दुमजली घर! गड्याला खाली थांबवून ते सगळे वर गेले.
थोड्या वेळाने पुन्हा सगळे खाली आले. जावई स्वातीताईला आणि समर्थला उन्हाळ्याच्या सुट्यांसाठी म्हणून सोडायला आले होते. पण त्यांच्या नोकरीमुळे त्यांना लगेच परत जायचं असेल असं अमोल म्हणाला. ते गाडीत बसून निघून गेले. केतनदादा पुन्हा दुकानात येऊन बसला.
तो उठून तिकडे गेला.
” काय केतनदादा! आहे का ओळख? ” तो
” माफ करा पण ओळखलं नाही मी! ” केतन
” अरे राजू मी! अमोलचा आतेभाऊ? ” राजू
” अरे बापरे! राजू तू? केवढा झालायस? बऱ्याच वर्षांनी नाही? ये ये बैस! ” केतनने राजासाठी एक खुर्ची टाकली.
” कसं चाललंय मग? ” राजू
” मस्त! लग्न झालं. बायको माहेरी गेलीय बाळांतपणाला. आठवडाभरात डेट आहे! ” केतन
” अरे वा! अभिनंदन ” राजू
” तू काय म्हणतोस? इतक्या वर्षांनी अनंतपूरचं भाग्य उजळलं! ” केतन
” अरे मी आता एम एस साठी अमेरिकेला चाललोय पुढच्या महिन्यात. म्हटलं भेटून जावं एकदा सगळ्यांना! ” राजू