मी गौरव मुंबई राहतो आमचे एकत्र कुटुंब आहे, माझे बाबा आणि मोठे काका दोघे सरकारी कर्मचारी आहेत आऊ (माझी आई ) आणि अव्वा ( मोठी काकू ) दोघी गृहिणी आहेत. मोठ्या काकांना ३ मुलं अनिश दादा ३५ वर्षाचा बँकेत काम करतो, अंजली ताई ३२ वर्षाची आर्किटेक्ट आहे आणि नेहा दीदी २८ वर्षाची लॉयर आहे. शेवटी मी शेंडे फळ २७ वर्षाचा सिविल इंजिनियर आहे. मग माझे लहान काका ३८ वर्षाचा दादा बरोबर तो हि बँकेत कामाला आहे आणि त्याची बायको मनीषा काकू ३४ वर्षाची घरातच असते. ६ वर्ष झाली लहान काकाच्या लग्नाला पण त्याना आजून मुल बाळ नाही आणि नंतर श्रद्धा वहिनी ( अनिश दादाची बायको ) ३१ वर्षाची ती बी.एम.सी मध्ये शिक्षिका आहे.
| आजोबांची बरीच प्रॉपर्टी होती, गेल्या दोन वर्षा पूर्वी ती प्रॉपर्टी बिल्डरला विकून आम्हाला खूप पैसा मिळाला त्या पैश्यातून आम्ही एक ६ बी.एच.के फ्लॅट घेतला गाडी वैगरे घेतली आणि त्यातला काही पैसा घेऊन मी आणि ताई आम्ही दोघांनी आर्किटेक्ट एण्ड कन्स्ट्रक्शनचा बिजनेस सुरु केला, आता आमचे सगळे काही व्यवस्थित चालले होते आमचा बिजनेससुद्धा दिवसेन दिवस चांगली प्रगती करत होता घरामध्ये आनंदी आनंद होता. में महिन्याचे दिवस होते लहान काका आणि दादा गाडी घेऊन मित्रांबरोबर फिरण्यासाठी म्हणून पाचगणीला गेले होते आणि परताना त्यांच्या गाडीला अपघात झाला, त्या अपघातात काका,दादा आणि त्यांचा एक मित्र तिघे मरण पावले. आता घरात सगळीकडे दु:खाचे वातावरण होते त्यातून वहिनीला दिवस गेले होते. तिला नववा महिना चालू होता डॉक्टरांनी वहिनीला जास्त त्रास होता काम नये हे अगोदरच सांगितले होते पण वहिनीचे रडणे थांबतच नव्हते. असो तर हळू हळू परिस्थिती आटोक्यात येऊ लागली आता सगळी जणं दु:ख विसरून हळू हळू आप आपल्या कामात गुंतू लागले होते. त्या रात्री वहिनीला लेबर पेन सुरु झाले आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेली पहाटे पहाटे वहिनीने एका सुंदर आणि गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी झाली म्हणून सगळेच नाराज झाले होते पण तिच्या जन्माने मला मात्र लॉटरी लागली कारण एवढे दिवस ज्या कामासाठी मी मेहनत करत होतो ते काम मला तिच्या पायगुणाने लगेच मिळाले, मी घरी हि गोड बातमी सांगितली आणि पेढे घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. मला बघून वहिनी थोडीशी अस्वस्थ झाली कारण विचारल्या वर वहिनी म्हणाली ।